गुरुवार, १४ सप्टेंबर, २०१७

स्वरूप

विठूराया चंद्रभागेच्या तीरी बसला विठू वरी दिसतो छान सुंदर तो जसा मोर वनी नाचतो देतो आशिर्वाद तो प्रत्येक भक्तास सर्व मिळुनि करती त्याची आरास आषाढी कार्तिकी तुज्या नामाचा नारा पंढरपुरीत वाहे भक्तिचा वारा नेसवूनि तुजला पिवळा पिंताबर भक्त घाली तुजला तुळशीचे हार केशरी पताका टाळ यांचा मिलाप होई पंढरीत वारी सम्पुनि देखील आठवतो विठूराया आमच्या तुमच्या मनी ॥

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा