शुक्रवार, १५ सप्टेंबर, २०१७

खरे प्रेम ज्याप्रमाणे समुद्र अथांग असतो .अगदी त्याचप्रमाणे प्रेम अथांग विस्तृत आहे .प्रेम आणि त्याचा ईतिहास यांचा खूप जवळचा आहे .प्रेम केवळ दोन जिवंत शरीरातले नसते .प्रेमाच्या अनेक परिभाषा आहेत .कृष्णा बद्दल असलेली मीराची भक्ति हे तिचे प्रेम होते . एक राधा एक मीरा दोनोने शाम को चाहा अंतर क्या दोनो की चाह में बोलो एक प्रेम दीवानी एक दर्द दीवानी या नुसार प्रेम कधी कधी भावना उसुक्तता यांचा आहारी अति प्रमाणात गेले तर त्याचा परिणाम विपरीत होतो . शेक्सपीयरची रोमीयो आणि जूलियेट या काल्पनिक कथेची मोहिनी प्रत्येक प्रेमदीवानाच्या मनावर पडली आहे .आणि त्यामुळे आजही प्रेम टिकून आहे .मात्र आधुनिक जगात आत्महत्या मानसिक शारीरिक पीड़ा ही परिभाषा प्रेमाची बनली आहे .मग अश्या वेळी खरे प्रेम कोणते ते कसे ओळखायचे .संकटाच्या वेळी वाचवनारा खरा प्रेमी जीवनाच्या प्रत्येक प्रसंगी साथ देणारा प्रेमी आपली सूखे पुढंच्याची दुखे वाटून घेणारा खरा प्रेमी प्रेम करणे आणि ते जगणे यात खूप फरक आहे आणि तो फरक ज्याला समजते तो माज्यामते खरा प्रेमी ,प्रेम समजणारा प्रेम हे पाळण्यात झोपलेल्या लहान मुलासारखे असते ज्याप्रमाणे लोरी गाऊन लहान मूल झोपते त्या प्रमाणे प्रेमात देखील कापसाहून मऊ शब्दानि ते नाते जपायचे असते कारण गुलाब भेट देऊन प्रेम व्यक्त होते मात्र साथ देऊन तेच प्रेम मुर्त स्वरूपाचे बनते .💓💗असॆ "दिल" प्रेम करण्यार्या लोकांकडे बघायला मिळतात .समाजाच्या द्रुष्टीनेप्रेम करणे प्रेमात पड़ने चुकीचे ठरवले जाते मात्र मला वाटते प्रेमाच्या नावाखाली जे अशम्य काम होते ते रोखायला पाहिजे.कारण प्रेम हा एक भाव आहे आणि जेव्हा शरीरातले मनातले भाव नष्ट होतात तेव्हा तो मनुष्य राहत नाही केवळ शरीर असते निर्जीव निस्तेज आणि भावशून्य .म्हणून प्रेम करणे अपराध नाही प्रेम न समजता चुकीचा निर्णय घेणे अपराध आहे . आवडल्यास नक्की share करा कारण जर तुम्ही share केले तर तुमचे माज्यावर असलेले खरे प्रेम मला कळेल 😘😋

३ टिप्पण्या: