बुधवार, २७ सप्टेंबर, २०१७

भाग दुसरा ___ नमस्कार मित्रहो कालच आपण एसटी आणि विनोद यांची सुरेख सांगड अनुभवलीत.खरे तर एसटीत नाना प्रकारची माणसे विविध प्रदेशातून येतात.त्यामुळे ज्याप्रमाणे कोशिंबीरीत विविध भाज्या टाकल्याने तिची चव रंग बदलते .अगदी त्याच प्रमाणे एसटीत नाना स्वभावाची माणसे एकत्र आल्याने विनोद आनंद यांची सरमिसळ होते. मी एसटीत तसाच शांत उभा होतो.अचानक एक कर्कश स्वर कानावर पडला, कारण नुकतेच भांडकुदल जोडपं एसटीत चढ़ले होते.ते जोडपं एकमेकांच्या तीर्थस्वरूप याना शिव्यांच्या मदतिने आठवत होते . शिवाय त्यांचे असॆ वागणे काही आज़िंना आवडले नाही म्हणून त्यानी स्वतचे तात्विक विचार सांगण्यास सुरवात केली .झाले , हे भांडण शांत होतय तेच कंडक्टर ओरडायला लागला , बस ही नक्कीच रेलवेपेक्षा लहान असते पण का कोण जाणे पण एसटीत गर्दी खूप आहे हे कंडक्टर आणि प्रवासी या दोघांना माहीत असते पण मोठी रेलवे असल्यासारखी कंडक्टर ओरडून सांगतो.की , ओ काकी व्हा पुढे खूप जागा आहे चला पुढे 😂असो . शेवटी मला जागा बसायला मिळाली.काही वेळाने माझ्याबाजूची व्यक्ति उतरली आणि एक बटर विकनारा स्वताचा टोप घेऊन माझ्या बाजूला येऊन बसला .काही वेळाने तो मी न विचारताच बटर आणि त्याचे प्रकार याची माहिती सांगू लागला .तेव्हा कळले की फुकट ची माहिती एसटीत सहज मिळते .माझा स्टॉप जवळ आला होता मी जागा सोडली व चुकून घाईत माझा पाय काकीच्या पायावर पडला त्या काकी वाकड्या नजरेने मनात ल्या मनात काही मंत्र पुटपुटू लागल्या मी एसटीतून उतरलो येथे विनोद एसटी आणि मी दूर गेलो होतो म्हणून सांगतो एकदा तरी हा अनुभव AC गाडी बाहेर पडून घ्या कारण येवा कोकण आपलाच असा . आवडल्यास share kara 😂😃

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा