मंगळवार, २६ सप्टेंबर, २०१७

मी आणि एसटी प्रवास --- प्रत्येक जण हा स्वतःचे अनुभव share करीत असतो.ते अनुभव अनेकदा विनोदी , दुःखी अथवा आनंदी असतात.तसा मला देखील एसटीतील वर्णन खूप विनोदी वाटते.ते असॆ-----एसटी येताच किती तर्हेची माणसे गर्दी करतात.मोठ मोठे बोजे घेऊन चढ़नारी माणसे असो वा शाळकरी मुले , म्हातारी माणसे असो वा अन्य माणसे सगळी जागा मिळवण्यासाठी धडपडत असतात त्यात सुवर्णयोग म्हणजे जरका खिडकी शेजारची जागा मिळाली तर त्या आनंदापुढे आकाश देखील लहान वाटते.त्यातच जागा आधीपासून अडवलेली असली आणि ती गेली तर तळपायाची आग मस्तकात जाते. तसेच तोंडात पान , गुट्खा भरलेली माणसे एसटीत चढ़ल्यावर कोपरे पिचकारीने रंगवण्यसाठी आतुरलेले असतात .हे सगळे मी शांतपणे पाहत होतो . गाडी पुढे गेल्यावर स्टॉप वरची गर्दी हळु हळु एसटीत येत गेली तेव्हा विनोदी वातावरण निर्माण झाले .आता एसटी जाम भरली होती अशात जर थोडासा वारा आला तर चंपा चमेली खोबरेल आणि नानाविध तेल लावलेल्या माणसांनी सुगंधाने एसटी न्हाऊन जाते आणि मीही .😓 तसेच जरासा चुकून कोणाला धक्का लागला तर तो माझ्याकडे अफजलखानाला मीच मारल्या सारखे पाहत असतो.तसेच कोणाचा चुकून स्टॉप चुकला म्हणजे तो त्या स्टॉप वर उतरला नाही चुकून तर तो माणूस बेलची दोरी अश्या जोमात ओढतो जसा काय तो कंडक्टरच आहे गप्पा पण वेगळ्या असतात दोन म्हातारे मनुष्य बाजार वाढ आतंक वादी हल्ला याविषयी बोलतात तर ऑफीसकाम असणाऱ्या बायका बॉस ची टिंगल करतात व त्याला खूप आशीर्वाद देतात शिवाय प्रेमी जोडपी कविता करत प्रवास करतात जसे की boyfriend girlfriend ला म्हणतो कवितेतून तू शिरा मी रवा तू पान मी फांदी तू चहा मी कप तसेच लहान शाळकरी मुले शिक्षक व त्यांची देहबोली यावर खदखदून हसतात काही गावातल्या बायका जागा न मिळाल्याने तांडव नूर्त्य करतात जे खूप विनोदी असते . तर काही सिंगल person मोबाईल ला netpack recharge नसतानाही उगाच screen टच करत बसतात . त्याचा एक फायदा नक्की होतो तो म्हणजे smartohone cha piece कोणता आहे हे लोकाना कळते . आणि हो हे सगळे जास्ती करून रत्नागिरील्या एसटीत दिसून येते . आवडल्यास नक्की share करा अजून खूप काही लिहाचय पण अजून प्रवास खूप लांब आहे मग तो एसटीतला असो वा आयुष्यातला जायच आहे जिथे पोहचायच मला 😁😘😎

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा