शुक्रवार, २९ सप्टेंबर, २०१७

चराचरात राम श्री-श्रेयवाद नसावा रा-राहूदे आनंद प्रत्येक मनी म-महत्म्य लोकांचा करावा आदर ज-जन्म लावावा सार्थकी य-यत्किँचितहि लोभ नसावा रा-राग मद मस्सर षड्रिपू अंगी नसावेत म-मन असूदे नेहमी प्रभुच्या सेवेत ज-जगी सर्वत्र संस्कार द्यावे य-हिंदू असो वा मुस्लिम सर्वांसी एक मानावे ज-जय असो वा पराजय खचून वा आनंदुन त्याने जाऊ नये य-या मंत्रासारखे असावे प्रत्येक मन रामा ठाई

बुधवार, २७ सप्टेंबर, २०१७

भाग दुसरा ___ नमस्कार मित्रहो कालच आपण एसटी आणि विनोद यांची सुरेख सांगड अनुभवलीत.खरे तर एसटीत नाना प्रकारची माणसे विविध प्रदेशातून येतात.त्यामुळे ज्याप्रमाणे कोशिंबीरीत विविध भाज्या टाकल्याने तिची चव रंग बदलते .अगदी त्याच प्रमाणे एसटीत नाना स्वभावाची माणसे एकत्र आल्याने विनोद आनंद यांची सरमिसळ होते. मी एसटीत तसाच शांत उभा होतो.अचानक एक कर्कश स्वर कानावर पडला, कारण नुकतेच भांडकुदल जोडपं एसटीत चढ़ले होते.ते जोडपं एकमेकांच्या तीर्थस्वरूप याना शिव्यांच्या मदतिने आठवत होते . शिवाय त्यांचे असॆ वागणे काही आज़िंना आवडले नाही म्हणून त्यानी स्वतचे तात्विक विचार सांगण्यास सुरवात केली .झाले , हे भांडण शांत होतय तेच कंडक्टर ओरडायला लागला , बस ही नक्कीच रेलवेपेक्षा लहान असते पण का कोण जाणे पण एसटीत गर्दी खूप आहे हे कंडक्टर आणि प्रवासी या दोघांना माहीत असते पण मोठी रेलवे असल्यासारखी कंडक्टर ओरडून सांगतो.की , ओ काकी व्हा पुढे खूप जागा आहे चला पुढे 😂असो . शेवटी मला जागा बसायला मिळाली.काही वेळाने माझ्याबाजूची व्यक्ति उतरली आणि एक बटर विकनारा स्वताचा टोप घेऊन माझ्या बाजूला येऊन बसला .काही वेळाने तो मी न विचारताच बटर आणि त्याचे प्रकार याची माहिती सांगू लागला .तेव्हा कळले की फुकट ची माहिती एसटीत सहज मिळते .माझा स्टॉप जवळ आला होता मी जागा सोडली व चुकून घाईत माझा पाय काकीच्या पायावर पडला त्या काकी वाकड्या नजरेने मनात ल्या मनात काही मंत्र पुटपुटू लागल्या मी एसटीतून उतरलो येथे विनोद एसटी आणि मी दूर गेलो होतो म्हणून सांगतो एकदा तरी हा अनुभव AC गाडी बाहेर पडून घ्या कारण येवा कोकण आपलाच असा . आवडल्यास share kara 😂😃

मंगळवार, २६ सप्टेंबर, २०१७

मी आणि एसटी प्रवास --- प्रत्येक जण हा स्वतःचे अनुभव share करीत असतो.ते अनुभव अनेकदा विनोदी , दुःखी अथवा आनंदी असतात.तसा मला देखील एसटीतील वर्णन खूप विनोदी वाटते.ते असॆ-----एसटी येताच किती तर्हेची माणसे गर्दी करतात.मोठ मोठे बोजे घेऊन चढ़नारी माणसे असो वा शाळकरी मुले , म्हातारी माणसे असो वा अन्य माणसे सगळी जागा मिळवण्यासाठी धडपडत असतात त्यात सुवर्णयोग म्हणजे जरका खिडकी शेजारची जागा मिळाली तर त्या आनंदापुढे आकाश देखील लहान वाटते.त्यातच जागा आधीपासून अडवलेली असली आणि ती गेली तर तळपायाची आग मस्तकात जाते. तसेच तोंडात पान , गुट्खा भरलेली माणसे एसटीत चढ़ल्यावर कोपरे पिचकारीने रंगवण्यसाठी आतुरलेले असतात .हे सगळे मी शांतपणे पाहत होतो . गाडी पुढे गेल्यावर स्टॉप वरची गर्दी हळु हळु एसटीत येत गेली तेव्हा विनोदी वातावरण निर्माण झाले .आता एसटी जाम भरली होती अशात जर थोडासा वारा आला तर चंपा चमेली खोबरेल आणि नानाविध तेल लावलेल्या माणसांनी सुगंधाने एसटी न्हाऊन जाते आणि मीही .😓 तसेच जरासा चुकून कोणाला धक्का लागला तर तो माझ्याकडे अफजलखानाला मीच मारल्या सारखे पाहत असतो.तसेच कोणाचा चुकून स्टॉप चुकला म्हणजे तो त्या स्टॉप वर उतरला नाही चुकून तर तो माणूस बेलची दोरी अश्या जोमात ओढतो जसा काय तो कंडक्टरच आहे गप्पा पण वेगळ्या असतात दोन म्हातारे मनुष्य बाजार वाढ आतंक वादी हल्ला याविषयी बोलतात तर ऑफीसकाम असणाऱ्या बायका बॉस ची टिंगल करतात व त्याला खूप आशीर्वाद देतात शिवाय प्रेमी जोडपी कविता करत प्रवास करतात जसे की boyfriend girlfriend ला म्हणतो कवितेतून तू शिरा मी रवा तू पान मी फांदी तू चहा मी कप तसेच लहान शाळकरी मुले शिक्षक व त्यांची देहबोली यावर खदखदून हसतात काही गावातल्या बायका जागा न मिळाल्याने तांडव नूर्त्य करतात जे खूप विनोदी असते . तर काही सिंगल person मोबाईल ला netpack recharge नसतानाही उगाच screen टच करत बसतात . त्याचा एक फायदा नक्की होतो तो म्हणजे smartohone cha piece कोणता आहे हे लोकाना कळते . आणि हो हे सगळे जास्ती करून रत्नागिरील्या एसटीत दिसून येते . आवडल्यास नक्की share करा अजून खूप काही लिहाचय पण अजून प्रवास खूप लांब आहे मग तो एसटीतला असो वा आयुष्यातला जायच आहे जिथे पोहचायच मला 😁😘😎

गुरुवार, २१ सप्टेंबर, २०१७

प्रेमामधले LO💗E अचानक पाहता तिला पुन्हा पहावेसे वाटते का कोण जाणे मन देखील हेच सांगते कसली आहे ही सुरवात कसली आहे ही चाहूल दोन मनातला नाही आहे ना प्रेमाचा पूल अभ्यासातली मदत असो वा एसटीतली सोबत मला माहितेय की तिचे चांगले मत आहे माझ्या बाबत एक दिवस असाच तिचा फोटो घेऊन बसलो होतो बघता तिचा फोटो माझे मीपण मी हरवलो होतो का कसे कोण जाणे अचानक आलो आम्ही दोघे एकमेकांसमोर; तेव्हा कळले की प्रेमाची मोहिनी पडलीय दोघांच्या मनावर कारण प्रेम हे प्रेम असते दोन name चे ते realation same असत समुद्र असो वा पाऊस;वारा असो वा गारा प्रेम सर्वत्र असते कारण काहीही असो दोन मनातले ते प्रेमातले LO💗E असते . ---स्वरूप

शुक्रवार, १५ सप्टेंबर, २०१७

खरे प्रेम ज्याप्रमाणे समुद्र अथांग असतो .अगदी त्याचप्रमाणे प्रेम अथांग विस्तृत आहे .प्रेम आणि त्याचा ईतिहास यांचा खूप जवळचा आहे .प्रेम केवळ दोन जिवंत शरीरातले नसते .प्रेमाच्या अनेक परिभाषा आहेत .कृष्णा बद्दल असलेली मीराची भक्ति हे तिचे प्रेम होते . एक राधा एक मीरा दोनोने शाम को चाहा अंतर क्या दोनो की चाह में बोलो एक प्रेम दीवानी एक दर्द दीवानी या नुसार प्रेम कधी कधी भावना उसुक्तता यांचा आहारी अति प्रमाणात गेले तर त्याचा परिणाम विपरीत होतो . शेक्सपीयरची रोमीयो आणि जूलियेट या काल्पनिक कथेची मोहिनी प्रत्येक प्रेमदीवानाच्या मनावर पडली आहे .आणि त्यामुळे आजही प्रेम टिकून आहे .मात्र आधुनिक जगात आत्महत्या मानसिक शारीरिक पीड़ा ही परिभाषा प्रेमाची बनली आहे .मग अश्या वेळी खरे प्रेम कोणते ते कसे ओळखायचे .संकटाच्या वेळी वाचवनारा खरा प्रेमी जीवनाच्या प्रत्येक प्रसंगी साथ देणारा प्रेमी आपली सूखे पुढंच्याची दुखे वाटून घेणारा खरा प्रेमी प्रेम करणे आणि ते जगणे यात खूप फरक आहे आणि तो फरक ज्याला समजते तो माज्यामते खरा प्रेमी ,प्रेम समजणारा प्रेम हे पाळण्यात झोपलेल्या लहान मुलासारखे असते ज्याप्रमाणे लोरी गाऊन लहान मूल झोपते त्या प्रमाणे प्रेमात देखील कापसाहून मऊ शब्दानि ते नाते जपायचे असते कारण गुलाब भेट देऊन प्रेम व्यक्त होते मात्र साथ देऊन तेच प्रेम मुर्त स्वरूपाचे बनते .💓💗असॆ "दिल" प्रेम करण्यार्या लोकांकडे बघायला मिळतात .समाजाच्या द्रुष्टीनेप्रेम करणे प्रेमात पड़ने चुकीचे ठरवले जाते मात्र मला वाटते प्रेमाच्या नावाखाली जे अशम्य काम होते ते रोखायला पाहिजे.कारण प्रेम हा एक भाव आहे आणि जेव्हा शरीरातले मनातले भाव नष्ट होतात तेव्हा तो मनुष्य राहत नाही केवळ शरीर असते निर्जीव निस्तेज आणि भावशून्य .म्हणून प्रेम करणे अपराध नाही प्रेम न समजता चुकीचा निर्णय घेणे अपराध आहे . आवडल्यास नक्की share करा कारण जर तुम्ही share केले तर तुमचे माज्यावर असलेले खरे प्रेम मला कळेल 😘😋

गुरुवार, १४ सप्टेंबर, २०१७

स्वरूप

विठूराया चंद्रभागेच्या तीरी बसला विठू वरी दिसतो छान सुंदर तो जसा मोर वनी नाचतो देतो आशिर्वाद तो प्रत्येक भक्तास सर्व मिळुनि करती त्याची आरास आषाढी कार्तिकी तुज्या नामाचा नारा पंढरपुरीत वाहे भक्तिचा वारा नेसवूनि तुजला पिवळा पिंताबर भक्त घाली तुजला तुळशीचे हार केशरी पताका टाळ यांचा मिलाप होई पंढरीत वारी सम्पुनि देखील आठवतो विठूराया आमच्या तुमच्या मनी ॥